सोळाव्या शतकातील गोमंन्तक" कथा लेखन स्पर्धा Basic Rules
सोळाव्या शतकातील गोमंन्तक" कथा लेखन स्पर्धा. (कोकणी व मराठीत ) १. हि स्पर्धा सर्वांना खुली आहे. २. कथा कोकणी किंवा मराठी देवनागरी लिपीतच स्विकारली जाईल. ३. PDF स्वरूपातील कथा इमेल द्वारे पाठवावी. (कागदावर लिहून त्यांचे फोटो काढून त्या सर्व फोटोंची पिडिएफ फाईल स्विकारली जाईल.) ४. शब्द मर्यादाः किमान २००० शब्द ५. १५३० ते १६०० या दरम्यान बाटाबाटी मुळे ५०० पेक्षा जास्त देवळे पाडली गेली, देवता स्थलांतरीत झाल्या हा कथेचा भाग असावा. ६. कथा ३० मे पर्यंत स्विकारली जाईल. ७. १५ मे पर्यंत 'मी स्पर्धेत भाग घेणार' असे नाव व संपर्क क्रमांकासह इमेल द्वारे स्पर्धकाने कळविणे अनिवार्य आहे. ८. एका स्पर्धकाने एकच कोकणी किंवा मराठी कथा पाठवावी. ९. स्पर्धकाने पुर्ण नाव, पत्ता व संपर्क नंबर नमूद करावा. 16thcenturyGoa.blogger.com या नावाने ब्लॉग असेल. या ब्लॉग मधे स्पर्धेचे नियम, संदर्भ साहित्य पुस्तक, आंतरजाल लिंक दिली जाईल.
तिसवाडीतील खालील गावातून 1540-1541 या काळात देवता स्थलांतरित झाल्या.
1. आझोशी Azossim लक्ष्मीनारायण - कुंडई
2. करमळी Carambolim ब्रम्हा - सत्तरीत
3. चिंबल Chimbel भगवती- माशेल (चिंबलकरीण )
4. चोडण Chorao रवळनाथ, भाऊकादेवी, मल्लिनाथ, भगवती, देवकी, संतपुरूष, बाराझान, नारायण, भाटेश्वर, चंद्रश्वर, Dadd-sancol -- माशेल
5. कुंभारजुवे शांतादुर्गा - माशेल (कुंभारजुवेकरीण)
6. दिवाडी Divar गणेश - खांडोळा
7. गन्से Gancim दुर्गादेवी - मडकई आणि कुंडई (नवदुर्गा)
8. जुवे Jua रवळनाथ, शांतादुर्गा, क्षेत्रपाळ - खांडोळा (वीर्डी)
9.तळावली Talaulim शांतादुर्गा, रवळनाथ - माशेल
नोंदणीकृत Statues नसलेली
1. केरात Caraim गजलक्ष्मी कारयकरीण - माशेल
2. नेवरा Neura Grand माधवा - मडकई
मंदिराजागी चर्च उभारली
1. बातीम Batim Our Lady of Gaudalupe नारायण मंदिर
2. करमळी Carambolim St. John the Baotist biggest temple of whole of island
3. दाउजी Daugim convent Nasso Mandre de Deus मोक्यू Moquea मंदिर
4. इला Ella Holly Trinity Church महादेव मंदिर
वरील सर्व माहिती Goa Hindu Temples and Deities या पुस्तकातून संकलन केलेली आहे.
श्रीकांत बर्वे
गोवा वेल्हा Goa Velha चामुंडेश्वरी - वरगाव-पिळगाव याबद्दल नोंद त्या पुस्तकात नाही.


Comments
Post a Comment